प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • विज्ञान मंडळ आणि पर्यावरण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नागपंचमीचे औचित्य साधून 'शालेय विज्ञान मंडळ २०२६' चा शानदार उद्घाटन समारंभ!

विज्ञान मंडळ आणि पर्यावरण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नागपंचमीचे औचित्य साधून 'शालेय विज्ञान मंडळ २०२६' चा शानदार उद्घाटन समारंभ!

विज्ञान मंडळ आणि पर्यावरण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नागपंचमीचे औचित्य साधून 'शालेय विज्ञान मंडळ २०२६' चा शानदार उद्घाटन समारंभ!

न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथे नागपंचमीचे औचित्य साधून विज्ञान मंडळ आणि पर्यावरण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'सन २०२६ च्या शालेय विज्ञान मंडळाचा उद्घाटन समारंभ' अत्यंत उत्साहात पार पडला !

​या संयुक्त उपक्रमांतर्गत 'साप व आपले पर्यावरण' या विषयावर विशेष प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रम आणि व्याख्यानाची ठळक वैशिष्ट्ये:

​प्रमुख व्याख्याते: शाळेचे माजी विद्यार्थी, प्रसिद्ध सर्पमित्र व व्याख्याते मा. श्री. संकेत सुमंत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी सापांबद्दल असणारे गैरसमज दूर करून, पर्यावरणातील सापांचे महत्त्व आणि त्यांचे जतन कसे करावे, याविषयी अत्यंत रंजक व माहितीपूर्ण व्याख्यान दिले.

सहाय्यक: श्री. अक्षय मराठे यांनी प्रात्यक्षिक व आयोजनात मोलाचे सहकार्य केले.

​वन विभागाची विशेष उपस्थिती:

या कार्यक्रमास फॉरेस्ट डिपार्टमेंट (वन विभाग) कडून विशेष उपस्थिती लाभली. यामध्ये वन विभागाच्या अधिकारी मगर मॅडम व त्यांच्या सहकारी गायकवाड मॅडम प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

​विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग:

इयत्ता ५ वी ते १० वी मधील निवडक ६५ विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून विविध प्रश्नांद्वारे आपली उत्सुकता दर्शवली.

​नागपंचमीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या संयुक्त उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण होण्यासोबतच निसर्ग व पर्यावरणाप्रती संवेदनशीलता वाढीस लागण्यास नक्कीच मदत होईल. विद्यार्थ्यांसाठी यानिमित्ताने 'मी साप बोलतोय.........' या आत्मवृत्तपर निबंध स्पर्धेचे ही आयोजन करण्यात आले. सहभागी सर्व विद्यार्थी, मार्गदर्शक व उपस्थितांचे मनःपूर्वक अभिनंदन!

कार्यक्रम

  • जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम

    जिल्हास्तरीय कबड्डी ...

    जिल्हा क्रीडा परिषद व पुणे महानगरपालिका आयोजित ... Read More

  • ऐंशीवा स्वातंत्र्यदिन साजरा

    ऐंशीवा स्वातंत्र्यदि ...

    80वा स्वातंत्र्य दिन

    शनिवार, 15 ऑगस्ट रोज ... Read More

  • गणित मंडळ व्याख्यान

    गणित मंडळ व्याख्यान

    शालेय गणित मंडळामार्फत इयत्ता पाचवी ते दहावी या ... Read More

  • क्लास साथी प्रशिक्षण १

    क्लास साथी प्रशिक्षण ...

    Class Saathi प्रशिक्षण कार्यक्रमाचा अहवाल

    Read More

  • आदर्श नागरिकत्व

    आदर्श नागरिकत्व

त्वरित माहितीसाठी लिंक्स