प्रवेश प्रक्रिया
नोंदणी अर्ज सादर करणे
प्रवेशाच्या अटींची पूर्तता
कागदपत्रांची पडताळणी
प्रवेशाची निश्चिती
आवश्यक कागदपत्रे सादर करणे
प्रवेशासाठी लिंक
शैक्षणिक वर्ष 2025-26 चे प्रवेश शनिवार, दिनांक 5 एप्रिल 2025 पासून मुले व मुली यांना सुरु.
शैक्षणिक वर्ष 2025-26 चे प्रवेश शनिवार, दिनांक 5 एप्रिल 2025 पासून मुले व मुली यांना सुरु.
प्रवेश प्रक्रिया
-
नोंदणी अर्ज सादर करणे:
- वर दिलेल्या लिंकमधून प्रवेशासाठी नोंदणी अर्ज भरावा किंवा ऑफिसच्या वेळेमध्ये शाळेमध्ये येऊन अर्ज भरावा.
- शनिवार, दिनांक ५ एप्रिल २०२५ पासून नोंदणी अर्ज सुरु होईल.
- सर्व माहिती अचूकपणे भरणे आवश्यक आहे.
-
प्रवेशाच्या अटींची पूर्तता :
- सर्व अटी पूर्ण झाल्याशिवाय प्रवेशाचा विचार केला जाणार नाही.
- पालकांनी शाळेच्या नियमांचे पालन करण्याची लेखी हमी द्यावी.
-
कागदपत्रांची पडताळणी:
- प्रवेश प्रक्रियेसाठी कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक आहे.
- प्रवेश सूचनेनुसार आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.
-
प्रवेशाची निश्चिती:
- वेळेत शुल्क भरून प्रवेश निश्चित करावा.
- शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून विद्यार्थी/विद्यार्थिनी शाळेमध्ये हजर असावे.
-
आवश्यक कागदपत्रे सादर करणे:
प्रवेश निश्चित करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे शाळेच्या कार्यालयात सादर करा.
आवश्यक कागदपत्रे
- शाळा सोडल्याचा (मूळ) दाखला
- जन्म दाखला (झेरॉक्स)
- रहिवासाचा पुरावा (झेरॉक्स)
- मागील शैक्षणिक नोंदी किंवा रिपोर्ट कार्ड
- 5 वी ते 8 वी – संचयिका आणि मागील वर्षाचा निकाल
- पासपोर्ट आकाराची छायाचित्रे (दोन प्रती)
- विद्यार्थी आणि पालकांचे आधार कार्ड (झेरॉक्स)
- कागदपत्रे उपलब्ध नसल्यास शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात जमा करावीत.