प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • ऐंशीवा स्वातंत्र्यदिन साजरा

ऐंशीवा स्वातंत्र्यदिन साजरा

ऐंशीवा स्वातंत्र्यदिन साजरा

80वा स्वातंत्र्य दिन

शनिवार, 15 ऑगस्ट रोजी प्रशालेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. माननीय पाहुण्यांच्या हस्ते ध्वज फडकविल्यानंतर सुस्वरात ध्वज गीत गायन व संपूर्ण वंदे मातरम् गीत गायन झाले. नंतर राष्ट्रगीत, महाराष्ट्र राज्यगीत, प्रतिज्ञा व संविधान प्रास्ताविक वाचन करण्यात आले.

NCC Cadets ची मानवंदना झाल्यावर सर्व विद्यार्थ्यांनी एकमुखाने समूहगान केले.

मा. मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता राव यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हटले की शैक्षणिक क्रांती घडविण्यात अग्रेसर असणारी आपली प्रशाला विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कायमच प्रयत्नशील असते. शाळेच्या प्रत्येक घटकाने मी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी काय योगदान याचा विचार करायला हवा. स्वातंत्र्याचे मूल्य ओळखून आपली भूमिका आपण सर्वांनी निश्चित करणे आवश्यक आहे.

यानंतर कार्यक्रमात श्री. रामकृष्ण चिंचकर यांनी प्रशालेचे माजी विद्यार्थी, प्रमुख पाहुणे श्री. अमृत देशमुख यांचा परिचय करून दिला. मा. पदाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले.

यानंतर इयत्ता दहावी मधील विद्यार्थिनी कु. श्रद्धा खिलारे, कु. शर्वरी सोनवलकर यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. चि. श्रेयान मांगडे व चि. श्रेयश आवाळे यांनी राष्ट्रभक्ती पर कविता सादर केली.

विविध शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तम यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक यांनतर करण्यात आले. चि. अर्णव खापर्डे व चि. निधीश सोळंकी यांनी विज्ञान विषयात लिहिलेल्या उल्लेखनीय शोध निबंध लिहिल्याबद्दल त्यांचेही कौतुक प्रमुख पाहुण्यांनी केले. उत्तम नेतृत्व गुण प्रदर्शित केल्याबद्दल NCC Cadets चि. विघ्नेश होले व चि. ओंकार सूर्यवंशी यांना मान्यवरांच्या हस्ते बॅज प्रदान करण्यात आला.

सन्माननीय पाहुणे श्री. अमृत देशमुख यांनी आपल्या मनोगतात सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कुशल नेतृत्वाखाली केलेल्या विविध मोहिमा आपल्याला युद्धकलेचे आदर्श नमुने दाखवितात. आंतरराष्ट्रीय इतिहासात भारताचे अनन्य साधारण महत्त्व आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. अनिल भोसले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अनेक जणांच्या समर्पणानंतर, अनेकांच्या बलिदानानंतर मिळालेले हे स्वातंत्र्य आहे, याचे स्मरण आपल्याला कायम असले पाहिजे.

या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून माजी विद्यार्थ्यांनी प्रशालेत रक्तदान शिबिर आयोजित केले. या शिबिरात माजी विद्यार्थी, पालक, शाळेचे कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले. एकूण 47 जणांनी रक्तदान केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन NCC एअरफोर्सचे अधिकारी, प्रशालेचे शिक्षक श्री. भरत महाजन यांनी केले.

कार्यक्रम

  • जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम

    जिल्हास्तरीय कबड्डी ...

    जिल्हा क्रीडा परिषद व पुणे महानगरपालिका आयोजित ... Read More

  • ऐंशीवा स्वातंत्र्यदिन साजरा

    ऐंशीवा स्वातंत्र्यदि ...

    80वा स्वातंत्र्य दिन

    शनिवार, 15 ऑगस्ट रोज ... Read More

  • गणित मंडळ व्याख्यान

    गणित मंडळ व्याख्यान

    शालेय गणित मंडळामार्फत इयत्ता पाचवी ते दहावी या ... Read More

  • क्लास साथी प्रशिक्षण १

    क्लास साथी प्रशिक्षण ...

    Class Saathi प्रशिक्षण कार्यक्रमाचा अहवाल

    Read More

  • आदर्श नागरिकत्व

    आदर्श नागरिकत्व

त्वरित माहितीसाठी लिंक्स