प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • क्लास साथी प्रशिक्षण १

क्लास साथी प्रशिक्षण १

क्लास साथी प्रशिक्षण १

Class Saathi प्रशिक्षण कार्यक्रमाचा अहवाल

२२ ऑगस्ट 2026 रोजी प्रशालेमध्ये समर्थनम ट्रस्ट यांच्या वतीने इयत्ता आठवी व नववी या विद्यार्थ्यांसाठी एक AI project वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आला या प्रोजेक्ट संदर्भात **Class Saathi या डिजिटल शैक्षणिक ॲपच्या वापराबाबत प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले.** या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश शिक्षकांना Class Saathi मधील विविध सुविधांची माहिती करून देणे आणि त्यांचा प्रभावीपणे अध्यापन प्रक्रियेत वापर करण्यास सक्षम करणे हा होता.

प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांना **ॲपमध्ये लॉग-इन करणे, विषय निवडणे व व्यवस्थापन करणे, वर्गामध्ये क्विझ घेणे तसेच स्वतःचे क्विझ तयार करणे** याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ॲपमध्ये उपलब्ध असलेल्या **Semi-English अभ्यासक्रमाचा वापर** कसा करावा, याची माहिती देण्यात आली.

विशेषतः **Whiteboard या सुविधेचा प्रभावी वापर** करून अध्यापन अधिक परस्परसंवादी, रंजक आणि विद्यार्थ्यांसाठी आनंददायी कसे करता येईल, याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. Whiteboard मधील विविध उपयुक्त साधनांचा परिचय करून देण्यात आला.

संपूर्ण प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विविध सुविधांचा प्रत्यक्ष वापर करून पाहताना शिक्षकांनी उत्सुकता आणि सकारात्मक प्रतिसाद दिला. AI class saathi प्रोजेक्ट व प्रशिक्षण आयोजनासार्भात प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुनीता राव, उपमुख्याध्यापक नाईक सर, पर्यवेक्षिका डॉ. गायकवाड मॅडम ,यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार श्रीमती नाकाडे वैशाली यांनी या सर्व प्रशिक्षणाच्या नियोजनाची कार्यवाही पूर्ण केली. सदर प्रशिक्षणामुळे डिजिटल साधनांचा वापर करून अध्यापन अधिक प्रभावी करण्यास निश्चितच मदत होणार आहे.

कार्यक्रम

  • जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम

    जिल्हास्तरीय कबड्डी ...

    जिल्हा क्रीडा परिषद व पुणे महानगरपालिका आयोजित ... Read More

  • ऐंशीवा स्वातंत्र्यदिन साजरा

    ऐंशीवा स्वातंत्र्यदि ...

    80वा स्वातंत्र्य दिन

    शनिवार, 15 ऑगस्ट रोज ... Read More

  • गणित मंडळ व्याख्यान

    गणित मंडळ व्याख्यान

    शालेय गणित मंडळामार्फत इयत्ता पाचवी ते दहावी या ... Read More

  • क्लास साथी प्रशिक्षण १

    क्लास साथी प्रशिक्षण ...

    Class Saathi प्रशिक्षण कार्यक्रमाचा अहवाल

    Read More

  • आदर्श नागरिकत्व

    आदर्श नागरिकत्व

त्वरित माहितीसाठी लिंक्स