प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • दहीहंडी उत्सव

दहीहंडी उत्सव

दहीहंडी उत्सव

शनिवार, दिनांक २४ ऑगस्ट, २०२४ रोजी शाळेत दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. इयत्ता दहावीच्यामुलांसाठी वर्गवार एकेक हंडीव मुलींसाठीही एक स्वतंत्र हंडी तयार केली गेली. आदल्या दिवशी प्रत्येक वर्गालासरावासाठी वेळही देण्यात आला. विद्यार्थ्यांनी तीन ते चार थर रचत जल्लोषात दहीहंडी फोडली. या कार्यक्रमात इयत्ता ५वी ६वी चे काही विद्यार्थी राधा व कृष्णाच्या वेशात उपस्थित होते. दहीहंडीमध्ये सर्वच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले होते. तसेच विद्यार्थ्यांना इजा पोहोचू नये यासाठीही जागरूक होते. सर्व हंड्या फोडून झाल्यावर मुलांना गोपाळकाल्याचा प्रसाद वाटण्यात आला. प्रसादाचे सर्व नियोजन श्रीमती सुवर्णा बोरकर व श्रीमती निकिता महाजन यांनी सहकारी शिक्षकांच्या सहकार्याने केले. 
याप्रसंगी कोणत्याही प्लास्टिक, थर्माकोल सारख्या पर्यावरणास हानी पोहोचविणाऱ्या घटकांचा वापर केला नाही, तसेच कोणत्याही प्रकारे पाण्याचा अपव्यय सुद्धा झाला नाही. खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक दहीहंडी साजरी झाली. मा. मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता राव, पर्यवेक्षक श्री. सुरेश वरगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती निकिता महाजन यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. 

कार्यक्रम

  • जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम

    जिल्हास्तरीय कबड्डी ...

    जिल्हा क्रीडा परिषद व पुणे महानगरपालिका आयोजित ... Read More

  • ऐंशीवा स्वातंत्र्यदिन साजरा

    ऐंशीवा स्वातंत्र्यदि ...

    80वा स्वातंत्र्य दिन

    शनिवार, 15 ऑगस्ट रोज ... Read More

  • गणित मंडळ व्याख्यान

    गणित मंडळ व्याख्यान

    शालेय गणित मंडळामार्फत इयत्ता पाचवी ते दहावी या ... Read More

  • क्लास साथी प्रशिक्षण १

    क्लास साथी प्रशिक्षण ...

    Class Saathi प्रशिक्षण कार्यक्रमाचा अहवाल

    Read More

  • आदर्श नागरिकत्व

    आदर्श नागरिकत्व

त्वरित माहितीसाठी लिंक्स