प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • राष्ट्रीय क्रीडा दिन

राष्ट्रीय क्रीडा दिन

राष्ट्रीय क्रीडा दिन

29 ऑगस्ट 2024 : रोजी न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड प्रशालेमध्ये ऑलम्पिक वीर मेजर ध्यानचंद यांच्या स्मृती प्रीत्यर्थ 'राष्ट्रीय क्रीडा दिन' साजरा करण्यात आला. प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा. सौ.राव, पर्यवेक्षक श्री. वरगंटीवार, शिक्षक प्रतिनिधी श्री. शिंदे यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन केले. शाळेतील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्री. चिंचकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना वर्गवाणीवरून मेजर ध्यानचंद यांबद्दल अत्यंत रोचक माहिती सांगितली. 
क्रीडा दिनाच्या निमित्ताने आज प्रशालेत इयत्ता दहावीच्या वर्गांची आंतरवर्गीय व्हॉलीबॉल स्पर्धा घेण्यात आली .अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यांमध्ये अंतिम सामना इयत्ता दहावी क या वर्गाने जिंकून विजेतेपद मिळविले. या स्पर्धांचे संयोजन व नियोजन ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्री. चिंचकर, श्री. शिंदे व इयत्ता दहावीचे सर्व वर्गशिक्षक यांच्या मदतीने क्रीडा प्रमुख सौ. महाजन यांनी केले. 

कार्यक्रम

  • जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम

    जिल्हास्तरीय कबड्डी ...

    जिल्हा क्रीडा परिषद व पुणे महानगरपालिका आयोजित ... Read More

  • ऐंशीवा स्वातंत्र्यदिन साजरा

    ऐंशीवा स्वातंत्र्यदि ...

    80वा स्वातंत्र्य दिन

    शनिवार, 15 ऑगस्ट रोज ... Read More

  • गणित मंडळ व्याख्यान

    गणित मंडळ व्याख्यान

    शालेय गणित मंडळामार्फत इयत्ता पाचवी ते दहावी या ... Read More

  • क्लास साथी प्रशिक्षण १

    क्लास साथी प्रशिक्षण ...

    Class Saathi प्रशिक्षण कार्यक्रमाचा अहवाल

    Read More

  • आदर्श नागरिकत्व

    आदर्श नागरिकत्व

त्वरित माहितीसाठी लिंक्स