प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड – 'इनोव्हेशन क्लब'चा यशस्वी शुभारंभ!

न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड – 'इनोव्हेशन क्लब'चा यशस्वी शुभारंभ!

न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड – 'इनोव्हेशन क्लब'चा यशस्वी शुभारंभ!

न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथे आज १७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:३० ते ११:३० या वेळेत 'इनोव्हेशन क्लब' अंतर्गत पहिल्या उत्सुकतापूर्ण आणि प्रेरणादायी सत्राचा यशस्वी शुभारंभ झाला!

​विद्यार्थ्यांमधील नवसंशोधक वृत्तीला चालना देणे, त्यांची निरीक्षण क्षमता वाढवणे आणि त्यांना प्रत्यक्ष समस्या निवारणाचे (Problem Solving) धडे देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

​सत्रातील प्रमुख ठळक वैशिष्ट्ये:

तज्ज्ञ मार्गदर्शन: 'समर्थ नाम फाउंडेशन' येथील मा. बराटे सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना अत्यंत सोप्या आणि रंजक भाषेत मार्गदर्शन केले.

संकल्पना स्पष्टता: 'इनोव्हेशन' (नवकल्पना) आणि 'इन्व्हेंशन' (शोध) यातील नेमका फरक काय, हे विविध प्रात्यक्षिके व उदाहरणांद्वारे समजून सांगण्यात आले.

​कृतीयुक्त शिक्षण (Problem Solving Activity): विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष काही वास्तववादी समस्या देण्यात आल्या आणि त्यांनी स्वतः विचार करून नाविन्यपूर्ण उपाय कसे शोधावेत, याचे प्रात्यक्षिक करून घेतले.

तसेच विज्ञानातील मूलभूत संकल्पना (जसे की Thrust, Drag, Gravity, Lift) आणि त्यांचा दैनंदिन जीवनातील उपयोग यावरही सविस्तर चर्चा झाली.

​'आयडिया बॉक्स'ची स्थापना: विद्यार्थ्यांच्या सुप्त आणि नवसंकल्पनांना योग्य व्यासपीठ मिळावे म्हणून प्रयोगशाळेत एक खास 'आयडिया बॉक्स' ठेवण्यात आला आहे. त्याचे महत्त्व, उपयोग आणि कार्यवाही याबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.

दर सोमवारी साडेदहा ते साडेअकरा या वेळेत प्रतिभावंत विद्यार्थी समस्या निराकरणासाठी एकत्र येणार आहे.

​उत्साही सहभाग: या पहिल्याच सत्रात १७ प्रतिभावंत विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्त आणि सक्रिय सहभाग नोंदवला.

​शाळेतील या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शोधकवृत्ती नक्कीच अधिक दृढ होईल. सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे मनःपूर्वक अभिनंदन !

कार्यक्रम

  • जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम

    जिल्हास्तरीय कबड्डी ...

    जिल्हा क्रीडा परिषद व पुणे महानगरपालिका आयोजित ... Read More

  • ऐंशीवा स्वातंत्र्यदिन साजरा

    ऐंशीवा स्वातंत्र्यदि ...

    80वा स्वातंत्र्य दिन

    शनिवार, 15 ऑगस्ट रोज ... Read More

  • गणित मंडळ व्याख्यान

    गणित मंडळ व्याख्यान

    शालेय गणित मंडळामार्फत इयत्ता पाचवी ते दहावी या ... Read More

  • क्लास साथी प्रशिक्षण १

    क्लास साथी प्रशिक्षण ...

    Class Saathi प्रशिक्षण कार्यक्रमाचा अहवाल

    Read More

  • आदर्श नागरिकत्व

    आदर्श नागरिकत्व

त्वरित माहितीसाठी लिंक्स