प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • ग. ह. पाटील पुरस्कार वितरण

ग. ह. पाटील पुरस्कार वितरण

ग. ह. पाटील पुरस्कार वितरण

 दि. २ ऑगस्ट २०२४ रोजी प्रशालेमध्ये कवी ग.ह.पाटील पुरस्कार सोहळा संपन्न झाला. कवी ग.ह.पाटील शाळेचे माजी विद्यार्थी व शिक्षणतज्ज्ञ होते. न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड पुणे शाळा व अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे ही संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा वस्त्रोद्योग मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी शाळेतील अभ्यास व क्रीडा क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार केला. 

मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते मा. डॉ. नीलिमा गुंडी यांना शाळेचे माजी विद्यार्थी व शिक्षणतज्ज्ञ, कवी गणेश हरि पाटील पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच मा. माधुरी सहस्त्रबुद्धे यांना जीवनागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर कार्यक्रमास डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे संस्थेच्या वतीने नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष मा. श्री. प्रमोद रावत,उपाध्यक्ष मा. श्री. अशोक पलांडे, कार्यवाह मा. श्री. आनंद काटीकर, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड पुणे शाळेचे शाला समिती अध्यक्ष मा. श्री. खेमराज रणपिसे,मुख्याध्यापिका मा. श्रीमती सुनीता राव व शिक्षणतज्ज्ञ मा. डॉ. सविता केळकर हे उपस्थित होते. 

शाला समिती अध्यक्ष मा. खेमराज रणपिसे यांनी शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत केले.अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे या संस्थेच्या वतीने मा. डॉ. संगीता बर्वे, मा. श्री. राजन लाखे, मा. श्री. विलास रासकर, मा. डॉ. दिलीप गरूड, मा. श्री. बी. आर. माडगूळकर, मा. श्री. भरत सुरसे मा. श्री. ज. गं. फगरे, मा. श्री. शिरीष चिटणीस मा. श्रीमती कविता मेहेंदळे, मा. श्री. विश्वनाथ भुजबळ, मा. श्रीमती मीरा शिंदे, मा. श्रीमती सीमा चव्हाण, मा. श्री. विनोद वाघ, मा. श्री. विजय जगताप, मा. श्री. सुनील भोसले इ. साहित्यिक उपस्थित होते. 

शाळेचे माजी विद्यार्थी व शिक्षणतज्ज्ञ, कवी गणेश हरि पाटील यांच्या वंशज मा. डॉ. मंदा खांडगे यावेळी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ मा. डॉ. न. म. जोशी यांनी भूषविले.श्रीमती निकिता महाजन यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. सूत्रसंचालन व नियोजन श्री. योगेश पाटील यांनी केले. 

कार्यक्रम

  • जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम

    जिल्हास्तरीय कबड्डी ...

    जिल्हा क्रीडा परिषद व पुणे महानगरपालिका आयोजित ... Read More

  • ऐंशीवा स्वातंत्र्यदिन साजरा

    ऐंशीवा स्वातंत्र्यदि ...

    80वा स्वातंत्र्य दिन

    शनिवार, 15 ऑगस्ट रोज ... Read More

  • गणित मंडळ व्याख्यान

    गणित मंडळ व्याख्यान

    शालेय गणित मंडळामार्फत इयत्ता पाचवी ते दहावी या ... Read More

  • क्लास साथी प्रशिक्षण १

    क्लास साथी प्रशिक्षण ...

    Class Saathi प्रशिक्षण कार्यक्रमाचा अहवाल

    Read More

  • आदर्श नागरिकत्व

    आदर्श नागरिकत्व

त्वरित माहितीसाठी लिंक्स